मुंबई – जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता बेजार झाली असताना आता दूध दरवाढीचा झटका बसला आहे. अमूलने पुन्हा एकदा आपल्या दुधाच्या किमतीत वाढ केली आहे. फुल क्रीम दूध ६३ रुपयांऐवजी ६६ रुपये प्रतिलिटर दराने मिळणार आहे.
त्याचप्रमाणे अमूलच्यावतीने म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर ५ रुपयांनी म्हणजे ६५ रुपयांवरून ७० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. अमूल दही आणि इतर उत्पादनाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. वाढलेले नवे दर आज म्हणजे ३ फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.अमूल उत्पादनाचे नवे दर पुढीलप्रमाणे -अमूल ताजा अर्धा लीटर – ५७ रुपये,ताजा एक लीटर- ५४ रुपये,गोल्ड अर्धा लीटर – ३३ रुपये,गोल्ड एक लीटर – ६६ रुपये,गाईचे दूध अर्धा लीटर – २८रुपये, गाईचे दूध अर्धा लीटर – ५६ रुपये रुपये,म्हशीचे दूध अर्धा लीटर- ३५ रुपये,म्हशीचे दूध अर्धा लीटर- ७० रुपये आहेत.दरम्यान,महिन्याच्या पहिल्याच दिवशी सहकारी व खासगी दूध डेअर्यांनी गायीच्या दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली होती. महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने याबाबत निर्णय घेतला आहे.