मुंबई – एकीकडे महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केलेली असताना भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, आता वाय प्लस ऐवजी एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे आता नवीन वाद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अमृता फडणवीस गायिका असून, त्यांची सामाजिक संस्था आहे. शिंदे गटाचे 41 आमदार आणि 10 खासदारांना वाय प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशा दोन्ही पदांचा कार्यभार असणार्या देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याने हा निर्णय घेतला आहे.