मुंबई – राजकीय भूमिका घेणाऱ्या अमृता फडणवीस आपल्या गायन कौशल्यामुळेही प्रसिद्ध आहेत. त्यांचे याआधीही अनेक अल्बम येऊन गेले. आजही त्यांचा ‘शिवतांडव स्त्रोत’ प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रदर्शित होताच युट्युबवर लाखोंहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तर, तासाभरात साडेपाच हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले.
महाशिवरात्र सण काहीच दिवसांवर आला आहे. त्यानिमित्ताने शिवतांडव स्त्रोत प्रदर्शित झाला आहे. शिवतांडव स्तोत्राला अत्यंत शक्तिशाली शिवस्तोत्र मानलं जातं. महादेवचा कट्टर भक्त असलेल्या रावणाने हे स्तोत्र लिहिलं आहे. या शिवतांडव स्तोत्राला शैलेश दाणी यांनी संगीतबद्ध केलं असून प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी व्हिडीओचं दिग्दर्शन केलं आहे. या व्हिडीओमध्ये भगवी वस्त्रं, रुद्राक्षांची आभूषणं असा अमृता यांचा लूक पहायला मिळतोय.
अमृता फडणवीस यांचे याआधीही प्रदर्शित झालेलं गाणं अत्यंत लोकप्रिय झाले होते. त्यानंतर आता महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेले हे स्त्रोत नेटीझेन्सच्या पसंतीस पडत आहे.