संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

अमृत भारत योजनेतून महाराष्ट्रातील १८ रेल्वे स्थानकांचा विकास होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

दिल्ली – महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा अमृत भारत योजनेतून महाराष्ट्रातील १८ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. यात पुणे, कोल्हापूर यासारख्या मोठ्या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे

यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी२ . ४१ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये सुमारे२,८०० किमी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्यमान रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण आणि नवीन रेल्वे लाईन टाकणे यांचा समावेश आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत देशभरातील १,२७५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. मिरज जंक्शन हे पुणे विभागातील पुण्यानंतरचे दुसरे सर्वाधिक महसूल देणारे स्टेशन आहे. पुनर्विकासांतर्गत मिरज स्थानक व फलाटांची सुधारणा, सर्व फलाटांची लांबी, रुंदी व उंची वाढविणे, पिट लाइनचे रखडलेले काम सुरू करणे, टाकणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
पुणे रेल्वे विभागांतर्गत मिरज, पुणे, कोल्हापूर, सातारा, चिंचवड, सांगली, कराड, हडपसर, बारामती, लोणंद, आकुर्डी, तळेगाव, हातकणंगले, वाठार, देहूरोड, उरळी, केडगाव आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेत समावेश करण्यात आला आहे.

मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी म्हणाले की, “देशभरात सुमारे ४०० वंदे भारत गाड्या सुरू केल्या जातील. महाराष्ट्रात शिर्डी-मुंबई आणि सोलापूर-मुंबई मार्गावर वंदे भारत गाड्या सुरू होत आहेत. त्याच मार्गावर कोल्हापूर ते मुंबई मार्गावरील वंदे भारत रेल्वेही सुरू होणार आहे. मुंबई-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे ही ट्रेन पूर्ण क्षमतेने कमी वेळेत सुरू होऊ शकते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या