संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

अमेरिकन शेअर बाजारातील मंदीचा अदानी आणि अंबानींना मोठा फटका

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वॉशिंग्टन- अमेरिकन शेअर बाजारात आलेल्या मंदीचा मोठा फटका जगातील टॉप ७० अब्जाधीशांना बसला आहे. भारताचे गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांचाही त्यात समावेश आहे. अमेरिकन शेअर बाजार गडगडल्यामुळे टेस्लाचे सीईओ एलन मस्क, गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत घट झाली आहे.

अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदरात वाढ केली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. याचा परिणाम अमेरिकन शेअर बाजारावर झाला. बाजार कोसळला. अब्जाधीशांच्या कोट्यावधींच्या संपत्तीचा त्यात चुराडा झाला. जगातील ७० अब्जाधीशांना अमेरिकन शेअर बाजारातील मंदीचा फटका बसला. त्यांच्या संपत्तीत घट झाली. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्या संपत्तीत ९.०३ अब्ज डॉलर्सची घट झाली. त्यांची एकूण संपत्ती २४५ अब्ज डॉलर्स होती. दुसऱ्या क्रमांकावर असलेले भारताचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत ३.५० अबाजाची घट झाली. अमेरिकन शेअर बाजारातील मंदीमुळे त्यांची संपत्ती घटली. अमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांच्या संपत्तीतही ३.७२ अब्ज डॉलर्सची घट झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत १.७७ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami