अबूधाबी- रशिया-अमेरिकेने आपापल्या तुरुंगात बंदिस्त असणाऱ्या एकमेकांच्या 2 कैद्यांची सुटका केली असून अमेरिकेने शस्त्रास्त्र डीलर व्हिक्टर बाउटची सुटका केली. तर त्या मोबदल्यात रशियाने अमेरिकेचा बास्केटबॉलपटू आणि ऑलिंपिक मेडलिस्ट ब्रिटेनी ग्रिनरची सुटका केली.
या दोन्ही कैद्यांना एका खासगी विमानाने यूएईच्या अबूधाबी विमानतळावर आणण्यात आले होते. रशियन माध्यमांनी या कैद्यांच्या अदलाबदलीचा एक व्हिडिओही जारी केला आहे. त्यात हे दोन्ही कैदी विमानतळावरून उतरून आपापल्या देशांच्या अधिकाऱ्यांसोबत मायदेशी परतताना दिसून येत आहेत. रशियाने गतवर्षी फेब्रवारी महिन्यात ग्रिनरला प्रतिबंदित कॅनाबीस ऑयलसोबत मॉस्को विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यानंतर जुलैमध्ये बायडेन प्रशासनाने तिच्या सुटकेच्या मोबदल्यात व्हिक्टर बाउटच्या सुटकेचा प्रस्ताव ठेवला होता. व्हिक्टर बाउट मागील 12 वर्षांपासून अमेरिकेच्या तुरुंगात होता. त्याला जगभरात अवैधपणे शस्त्र निर्यातीप्रकरणी मर्चेंट ऑफ डेथ म्हणजे मौत का सौदागर म्हणून ओळखले जाते.