संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

अमेरिकेचा सीरियावर हवाईहल्ला; इसिसचा म्होरक्या अबू कुरेशी ठार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वॉशिंग्टन – अमेरिकन लष्करी हल्ल्याची चाहूल लागताच इसिसचा म्होरक्या अबू इब्राहिम अल हशमी अल कुरेशीने स्वतःसह कुटुंबाला बॉम्बने उडवले. त्यात तो कुटुंबासह ठार झाला. या घटनेत ६ मुले आणि ४ महिलांसह एकंदर १३ जण ठार झाले, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडन यांनी आज येथे दिली.

सीरियातील इसिसचा म्होरक्या अबू इब्राहिमवर हवाई हल्ला करण्याची योजना अमेरिकन लष्कराने आखली होती. त्यात २४ खास कमांडो, जेट व रिपर ड्रोन आणि हेलिकॉप्टर गनशीप यांचा समावेश होता. अमेरिकेच्या या ऑपरेशनची माहिती मिळताच अबू इब्राहिमने बॉम्ब स्फोट घडवला. त्यात तो आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य ठार झाले. अमेरिकन लष्कराने २०१९ मध्ये केलेल्या कारवाईत बगदादीला ठार केले होते. त्यापूर्वी २०११ मध्ये ओसामा बिन लादेनलाही मारले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami