संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या
वडिलोपार्जित घराची झडती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वॉशिंगटन -अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात एफबीआयने राष्ट्राध्यक्ष बायडेनयांच्या डेलावेअर येथील वडिलोपार्जित घराची झडती घेतली आहे. काही महत्वाची कागदपत्रे गायब झाल्याच्या संदर्भात एफबीआयच्या पथकाने त्या घरात जाऊन शोध घेतला. याआधीही एफबीआयने बायडेनच्या या घराची झडती घेतली होती आणि त्यावेळी त्यांच्या गॅरेज आणि लायब्ररीमध्ये काही गुप्त कागदपत्रे सापडली होती.
बायडेन यांचे हे घर रेहोबोथ भागात आहे. फेडरल डिपार्टमेंट ऑफ जस्टिस देखील एफबीआयच्या तपासात सामील झाले आहे. काही दिवसांपूर्वी याच टीमने वॉशिंग्टनमधील बायडेन यांच्या जुन्या कार्यालयाचीही झडती घेतली होती. बायडेन यांची डेलावेअर मध्ये दोन घरे आहेत. ११ जानेवारी रोजी रेहोबोथ आणि विल्मिंग्टन येथील बायडेन यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. विल्मिंग्टनच्या घरी काही कागदपत्रे सापडली, पण रेहोबोथमध्ये काहीही सापडले नाही. 20 जानेवारी रोजी पुन्हा शोध घेण्यात आला. बुधवारी झालेल्या तपासात राष्ट्राध्यक्षांनी पूर्ण सहकार्य केले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाला सुरुवात झाली. ही कागदपत्रे 2009 ते 2017 मधील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या काळात बायडेन हे बराक ओबामा सरकारमध्ये उपाध्यक्ष होते. ही कागदपत्रे बेकायदेशीरपणे बाळगल्याचा बायडेन यांच्यावर आरोप आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या