अमेरिकेतील लहान मुले कोरोनाच्या विळख्यात! ६८ लाख जण संक्रमित

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

न्यूयॉर्क – अमेरिकेत सध्या वेगाने फैलावत असलेल्या करोनाने लहान मुलांना विळख्यात घेण्यास सुरवात केली असून ही जगासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. अकॅडमी ऑफ पेडी अँट्रिक्सच्या ताज्या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान १,४१,९०५ मुले कोरोना संक्रमित झाल्याची पुष्टी झाली आहे. गेल्या दोन आठवड्याच्या तुलनेत हे प्रमाण ३२ टक्क्यांनी वाढले आहे. अमेरिकेत गेल्या आठवड्यात करोना संक्रमितांच्या एकूण संख्येत मुलांची संख्या १/३ असल्याचे या अहवालात नमूद केले गेले आहे.

अमेरिकेत एकूण लोकसंख्येत लहान मुलांचे प्रमाण २२ टक्के आहे. संक्रमित मुलांचे प्रमाण ३ टक्के असून ६८ लाख मुले संक्रमित झाली आहेत. अर्थात लहान मुलांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. अमेरिकेच्या सहा राज्यात कोरोनामुळे एकाही मुलाचा मृत्यू झालेला नाही. संक्रमित मुलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे वेळोवेळी मुलांना इंफ्ल्यूएन्झा, मेनिन्जायटीस, गोवर, हेपिटायटीस लसी दिल्या गेल्या आहेत त्यामुळे त्यांच्यात रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये ५ ते ११ वयोगटातील ८३०० मुले रुग्णालयात दाखल होती त्यातील १७२ मुलांचा मृत्यू झाला. कोरोनाचा प्रसार वेग अधिक असल्याने शाळा बंद केल्या गेल्या. त्यामुळे १२ लाख मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम दिसून आला. शाळा पुन्हा सुरू झाल्यावर पुन्हा कोरोना प्रसार वेग वाढला असून आता सर्व वयोगटातील मुलांमध्ये कोरोना संक्रमण दिसून येत आहे.

Close Bitnami banner
Bitnami