संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या! सोबत राहणाऱ्याला अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वॉशिंग्टन : अमेरिकेत भारतीय वंशाच्या 20 वर्षीय विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर तरुणाच्या सोबत राहणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. वरुण मनीष छेडा हा तरुण इंडियानामध्ये पर्ड्यू विद्यापीठात शिकत होता. याप्रकरणी त्याच्यासोबत राहणाऱ्या कोरियन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

वरुण मनीष छेडा हा पर्ड्यू विद्यापीठात डेटा सायन्स शिकत असून कोरियन विद्यार्थी जी मिन जिमी शा यासोबत हॉस्टेलवर रुम शेअर करत होता.दरम्यान,वरुण हा मंगळवारी रात्री ऑनलाइन गेम खेळत होता आणि मित्रांसोबत बोलत होता. तेवढ्यात अचानक ओरडण्याचा आवाज आला..त्यानंतर विद्यापीठाच्या कँपसमध्ये मॅककचॉन हॉलच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत छेडा मृत अवस्थेत सापडला. अशी माहिती मृत विद्यार्थ्याचा मित्र अरुणभ सिन्हाने दिली. याप्रकरणी 22 वर्षीय कोरियन विद्यार्थी जिमी शा याला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.त्यानेच रात्री 12:25 वाजचा फोनवरुन हत्येची माहिती दिली होती,असे पोलीस प्रमुख लेस्ले व्हिएट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.शवविश्चेदन अहवालानंतर,छेडा यांचा मृत्यू अनेक गंभीर जखमांमुळे झाला असल्याचे समोर आले. आरोपीला पुढील तपासासाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तसेच आठ वर्षापूर्वीही अशी घटना विद्यापीठाच्या कँपसमध्ये घडली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami