वॉशिंग्टन – अमेरिकेच्या ओक्लाहोमातील तुलसात रुग्णालयाजवळच्या इमारतीत बुधवारी बेछूट गोळीबार झाला. त्यात एका बंदूकधारीसह ४ जणांचा मृत्यू झाला. यात इतर अनेकजण जखमी झाले आहेत. रुग्णालयाजवळील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. त्यानंतर सेंट फ्रान्सिस रुग्णालय रिकामे केले, अशी माहिती तुलसा पोलीस विभागाने ट्विटमध्ये दिली.
ओक्लाहोमाच्या तुळसा येथील सेंट फ्रान्सिस रुग्णालय परिसरातील इमारतीत बुधवारी बंदूकधारी हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. दुसऱ्या मजल्यावर घडलेल्या या घटनेत बंदूकधारीसह चौघांचा मृत्यू झाला. या गोळीबाराची माहिती इमारतीतील रहिवाशांनी पोलिसांना दिली. तेव्हा घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. जखमींना रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात ४ जण ठार झाले. त्यात एक बंदूकधारी होता. त्याच्याकडे एक मोठी बंदूक आणि पिस्तूल होते. त्यामुळे तो हल्लेखोर असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.