संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

अमोल कोल्हेंनी शब्द पाळला; बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – पुण्याच्या निमगाव दावडीमध्ये आज दुपारी बैलगाडा शर्यतीचा मोठा थरार पार पडला. या शर्यतीत शिरुरचे खासदार अमोल कोल्हेंनी घोडीवरुन धावून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना दिलेला आश्‍वासनाचा शब्द पूर्ण केला. या शर्यतीत बैलजोडीसोबत घोडीवर स्वार होऊन ते दोन हात वर करून मोठ्या जोशात धावले. त्याआधी त्यांनी घोडीवर बसताच आपली मांडी आणि दंड थोपटून प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले. तेथील सर्वांची त्यांनी मने जिंकली.

‘मी बैलगाडा शर्यतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे’, असे त्यांनी सांगितले.
खासदार अमोल कोल्हेंनी बंदी झालेली बैलगाडा शर्यत सुरु होण्यासाठी लोकसभेपासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत विशेष प्रयत्न केले आहे. त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी कोल्हेंनी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु झाली, तर बैलगाडी शर्यतीत घोडी घरीन, असे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाचे आठवण करुन कोल्हेंना शर्यतीत घाडी धरण्याचे आव्हान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी दिले होते. त्यानंतर हे आव्हान स्वीकारत आज कोल्हेंनी पुण्यातील निमगाव दावडीमध्ये आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत उतरले आणि घाडीवर बसून त्यांनी आपली मांडी आणि दंड थोपडले. त्यानंतर धावताना ते हात वर करुन धावले. त्यावेळी लोकांनी एकच जल्लोष केला. हा थरार पाहून त्यांनी लोकांची मने जिंकली.

या शर्यतीदरम्यान कोल्हे म्हणाले की, बैलगाडी शर्यत सुरु झाल्याने बैलांच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच आता ग्रामीण अर्थकरणाला वेग आला आहे. तसेच पर्यटनालाही चालना मिळणार आहे. आपण अर्धी लढाई जिंकली आहे. अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर होणार आहे. या शर्यतींचा आढावा सुनावणीत घेतला जाणार आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन बैलगाडा मालक योग्यरित्या पाळत असल्याने मी त्याचे आभार मानतो, असे कोल्हेंनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami