संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

अरबी समुद्रात पुन्हा वादळ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुरूड-   अरबी समुद्रात बुधवारी पहाटे पासून पुन्हा मोठे वादळ उठले असून उपरती वादळी वारे आणि पाऊस कोसळू लागल्याने खोल समुद्रातील परिस्थिती बिकट बनली आहे. माहेश्वरी मच्चीमार सोसायटी एकदरा चे व्हॉइस चेअरमन ध्रुव गोपाळ लोदी, हनुमान मच्चीमार सोसायटीचे चेअरमन पांडुरंग आगरकर, ललित मढवी (सर्व रा. एकदरा) यांनी बुधवारी दुपारी सांगितले की, खोल समुद्रात वादळी वारे आणि मोठ्या लाटा उसळत असून वेग वाढल्याने मच्चीमारांतुन घबराट उडाली आहे.ही सर्व अतिवृष्टी ची लक्षणे आहेत अशी माहिती बुजुर्ग मच्छिमारांनी दिली.

                    मासेमारीस खोल समुद्रात गेलेल्या वेरावळ, बलसाड, गुजरात, महाराष्ट्रातील मासेमारी नौका मासेमारी अर्धवट सोडून वादळात सुरक्षितता म्हणून दिघी-आगरदांडा बंदराकडे येत असून त्यांचा हा आटापिटा मुरूड समुद्र किनाऱ्यावरुन दिसून येत आहे.1 ऑगस्ट पासून मासेमारी सुरू झाल्या पासून मासेमारी अर्ध्यावर सोडून येण्याची ही चवथी वेळ आहे, अशी माहीती मच्चीमार सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.या मुळे मच्चीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मधल्या काळात छोट्या मच्चीमारांचा सिझन देखील मासळी मिळत नसल्याने वाया गेला होता. चारही सिझन मध्ये मच्चीमारांवर संकटांची मालिका सुरूच असून अतोनात नुकसान झाल्याची माहिती रोहन निशानदार( नाखवा) यांनी दिली.समुद्रात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडत असून लाटांचे तांडव वाढले आहे, अशी माहिती पदमदुर्ग समुद्र परिसरात बुधवारी दुपारी कोलंबी मासेमारी करणाऱ्या रोहन निशानदार यांनी प्रत्यक्ष समुद्रातुन बोलताना दिली.गुजरात राज्यातील नौकांनी वादळापासून बचाव करण्यासाठी आगरदांडा-दिघी बंदराचा आश्रय घेतल्याचे रोहन निशानदार यांनी स्पष्ट केले.बुधवारी दुपारी 3 वाजल्यापासून समुद्रात वादळी वारे आणि जोरदार पाऊस पडत आहे.मुरूड परिसरात देखील पाऊस पुन्हा जोरदार पणे सक्रीय झाला आहे.

            प्रसिद्ध हवामान तज्ञ श्री पंजाबराव डंख यांनी पश्चिम किनाऱ्यावर अतिवृष्टी चा इशारा दिला असून ऐन गणेशोत्सवात विजेच्या गडगडाटासह पाऊस पडू लागला आहे.गेल्या काही तासात समुद्राचे रूप खवळले असून छोटे मच्चीमार किनाऱ्यावर परतले आहेत.अरबी समुद्रात पूर्वी वादळे येत नसत.सध्या कधीही समुद्रात वादळ येऊ लागल्याने मासेमारीचा कोणताही नेमच राहिला नाही.त्या मुळे मच्चीमारांचे आर्थिक जीवन अस्थिर बनले आहे.मासेमारीस गेल्यानंतर डिझेलचा खर्च देखील सुटत नाही. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने मच्छिमारांच्या समस्यांवर उपाययोजना करावी अशी सातत्याने मच्चीमारांची मागणी आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami