संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

अरुणाचल प्रदेशात पुन्हालष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

इटानगर- अरुणाचल प्रदेशमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. तुटिंग मुख्यालयाजवळ लष्कराचे हेलिकॉप्टर आज सकाळी 10.40 च्या सुमारास कोसळले. मदत आणि बचावकार्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. याआधीही अरुणाचल प्रदेशातच ५ ऑक्टोबरला चित्ता हेलिकॉप्टर कोसळून एक पायलट शहीद झाला होता.

ही दुर्घटना अप्पर सियांग जिल्ह्यातील टुटिंग मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर असलेल्या सिंगिंग गावाजवळ घडली.
एसपी जुम्मर बसर यांनी सांगितले की,ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. यामुळे अशा परिस्थितीत बचावकार्यासाठीही अडचणी येत आहेत. मात्र, घटनास्थळी बचाव पथक पाठवण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशातच 5 ऑक्टोबर रोजी चीता हेलिकॉप्टर कोसळले होते. तवांग येथे झालेल्या या अपघातात भारतीय लष्कराच्या पायलटचा मृत्यू झाला. तवांगजवळ नियमित उड्डाण सुरू असताना सकाळी १० वाजता हा अपघात झाला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami