संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

अरुणाचल प्रदेशात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले, पायलट ठार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

इटानगर – अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला असून दुसरा पायलट जखमी झाला आहे. लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव असे मृत्युमुखी पडलेल्या पायलटचे नाव आहे. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नियमित विमान प्रवासादरम्यान ही घटना घडली. हेलिकॉप्टर कोसळल्यावर दोन्ही वैमानिकांना जवळच्या लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. दुसऱ्या जखमी पायलटवर उपचार सुरू आहेत.हेलिकॉप्टर जामिथांग सर्कलच्या बीटीके क्षेत्राजवळील न्यामजंग चू येथे कोसळले. प्राथमिक अवस्थेत अपघाताचे कारण समजू शकले नाही. त्याचा तपशील पडताळण्यात येत आहे.या वर्षी मार्चमध्ये उत्तर काश्मीरमधील गुरेझ सेक्टरमध्ये चीता हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. या अपघातात लष्कराच्या पायलटचा मृत्यू झाला. त्याचा सहवैमानिक गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. 8 डिसेंबर 2021 रोजी कुन्नूर, तामिळनाडू येथे त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या हेलिकॉप्टरमध्ये जनरल रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह लष्कराचे १४ जण होते. हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami