इटानगर – दिल्ली-एनआरसी पाठोपाठ आज सकाळी अरुणाचल प्रदेशातील काही भागात भुकंपाचे धक्के जाणवले.आज सकाळी १०.३१ वाजण्याच्या सुमारास जाणवलेल्या या भुकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम सियांग जिल्ह्यात असल्याची माहिती राष्ट्रीय भुकंपशास्त्र संस्थेने दिली आहे.या भुकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.
या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केलवर ५.७ इतकी होती. याआधी काल रात्री दिल्लीतील एनआरसीसह उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातही भूकंपाचे झटके जाणवले होते.रात्री झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ आणि मणिपूर येथे होता.