संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

अर्थसंकल्पानंतर सोने दरात घसघशीत घसरण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला आणि आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर आज 0.25 टक्क्यांनी घसरला. त्यामुळे आज सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 48,980 रुपये इतके आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

२०२० मध्ये याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर होता. तर आजच्या काळात मॅक्स कमॉडीटी एक्सचेंजवर सोने 48,980 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. याचाच अर्थ सोने अजूनही सुमारे 7,220 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

महत्त्वाचे म्हणजे आज चांदीच्या दरातही किंचित घट झाली. चांदीचे दर 0.01 टक्क्यांनी घसरले. त्यामुळे आज 1 किलो चांदीचा दर 62,000 रुपये इतका आहे. दरम्यान, मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४४,९०० रुपये, २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,९८० प्रति १० ग्रॅम आहे. तर पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा दर ४४,८५० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,९८० रुपये इतका आहे. नागपूरमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ४४,८५०, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,९८० रुपये इतका आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami