संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

अलीगडच्या मांस कारखान्यात अमोनिया वायूगळती !१०० जण बेशुद्ध

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अलीगड – उत्तर प्रदेशातील अलिगडमधील मांस कारखान्यात गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. येथील अल दुआ मांस फॅक्टरीच्या प्लांटमधून अमोनिया गॅसची गळती झाली. या दुर्घटनेत १०० होऊन अधिकजण बेशुद्ध झाले.सुरुवातीला एका महिलेचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. मात्र,जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे म्हटले आहे. जिल्हाधिकारी इंदर विक्रम सिंह म्हणाले, “सर्व बेशुद्ध झालेल्यांची प्रकृती स्थिर आहे.मृत्यूची नोंद नाही. अफवांकडे दुर्लक्ष करा. आम्ही वैद्यकीय पथकाच्या सतत संपर्कात आहोत. सर्वांना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत.” रोरावार येथील मथुरा बायपासजवळ असलेल्या अल दुआ मीट फॅक्टरीत गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली.सकाळी कामगार कारखान्यात काम करत होते.त्यात बहुतांश महिला होत्या.अचानक प्लांटमधून अमोनिया गॅसची गळती सुरू झाली.यानंतर कारखान्यात पळापळ सुरू झाली.कोणालाच काही समजत नव्हते.एकामागून एक महिला कामगार बेशुद्ध पडत होत्या.आजूबाजूच्या गावातील लोकांनी बेशुद्ध व्यक्तींना वाहनांमध्ये भरून वैद्यकीय महाविद्यालय गाठले.घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी इंदर विक्रम सिंह आणि एसएसपी कलानिधी नैथनी मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले.येथे त्यांनी जखमींकडून घटनेची माहिती घेतली. जिल्हाधिकारी इंदर विक्रम सिंह यांनी सांगितले की, मांस कारखान्यात पॅकेजिंगचे काम केले जाते. बहुतांश कर्मचारी महिला आहेत.तसेच त्यांच्या सोबत असणारी काही मुलेही बेशुद्ध पडली होती. अमोनिया गॅसच्या गळतीमुळे ही दुर्घटना घडली.सर्वांवर जवाहर नेहरू वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सुरुवातीला ही घटना लपविण्याचा प्रयत्न फॅक्टरी मालकाने केला असल्याचा आरोप होत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami