संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

अविनाश भोसलेंना हायकोर्टाचा दिलासा! मालमत्ता ताब्यात न घेण्याचे ईडीला आदेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- येस बँक, डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची मालमत्ता जप्त करू नये, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयामुळे अविनाश भोसले यांना दिलासा मिळाला आहे.

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट अंतर्गत निर्णय घेणार्‍या प्राधिकरणाने अलीकडेच भोसले आणि इतरांविरुद्ध नोंदवलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याच्या संदर्भात ईडीकडून मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यात मालमत्ता रिकामी करण्यास सांगण्यात आले होते. सीबीआयने आधी अटक केल्यानंतर ईडीनेही त्यांना कारवाईची नोटीस बजावली होती. या नोटिशीत त्यांना त्यांची पुण्यातील मालमत्ता रिकामी करण्यास सांगण्यात आले होते. गेल्या वर्षी मनी लाँड्रींगच्या प्रकरणात ही मालमत्ता ईडीने जप्त केली होती. या मालमत्तेची किंमत साधारण 4 कोटी 73 लाख इतकी आहे. अविनाश भोसले यांना सीबीआयने आधीच अटक केली होती. त्यात ईडीनेही मालमत्तेसंदर्भात नोटीस बजावली. मनी लाँडरिंग प्रकरणाव्यतिरिक्त ईडीने फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप त्यांच्यावर ठेवला होता. याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली होती. तर येस बँक-डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी त्यांचा सीबीआयकडून तपास सुरू आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami