संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

अश्‍विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा टाईम लाईन नकाशा सादर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पनवेल- महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बहुचर्चित सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे हत्याकांड खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून काल सायबर तज्ज्ञ रोशन बंगेरा यांची साक्ष पूर्ण करण्यात आली. यावेळी मयत अश्‍विनी बिंद्रे आणि मुख्य आरोपी अभय कुरुंदकर या दोघांचा एकत्र असलेला टाईम लाईन नकाशा न्यायालयात सादर करण्यात आला.

यावेळी रोशन बंगेरा यांनी बिंद्रे आणि कुरुंदकर यांच्या मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, लॅपटॉप आणि अन्य सोशल मीडियावर झालेल्या संभाषणाचा डाटा काल न्यायालयात सादर केला. कुरुंदकर यांचा मेल आयडी ओपन करून सर्व व्हॉट्सअ‍ॅप नंबर नवीन मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घेतले. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप संदेश बोलणे याच्या प्रिंटआऊट काढून त्यावर सह्या केल्या होत्या. त्या न्यायालयात सादर केल्या. यामध्ये कुरुंदकर हे ‘यू साठी वाय’ हा शद्ब वापरत होते. तसेच अश्‍विनी बिंद्रे यांच्या हत्येच्या दिवशी कुरुंदकर यांचे गाडीतून फिरणे आणि त्याची वेळ असलेला टाईम लाईन नकाशा न्यायालयात सादर करण्यात आला. तसेच हत्येच्या दुसर्‍या दिवशी कुरुंदकर आणि इतर आरोपी कुठे होते याची माहिती असणार्‍या नकाशाच्या प्रिंटआऊटवर रोशन बंगेरा यांच्याच सह्या असल्याची साक्ष बंगेरा यांनी काल न्यायालयात दिली. या साक्षी वेळी न्यायालयात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, राजू गोरे, एसीपी संगीता शिंदे-अल्फान्सो, नवी मुंबई पोलीस अधिकारी आरोपीचे वकील आणि आरोपी हजर होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami