संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM चे सर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर उत्तर प्रदेशात गोळीबार झाला आहे. सुदैवाने यात ते बचावले आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी हे सध्या प्रचार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या गाडीवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या खुणा त्यांच्या गाडीवर दिसून येत आहेत. मात्र, या हल्ल्यात सुदैवानं कुणीही जखमी झालं नाही. “काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. 4 राऊंड फायर करण्यात आले. 3 ते 4 लोक होते, सर्वजण पळून गेले आणि शस्त्र तिथेच सोडून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, मात्र मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो. आम्ही सर्वजण सुखरुप आहोत”, असं ट्वीट ओवेसी यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी गोळीबाराच्या खुणा असलेला गाडीचा फोटोही शेअर केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार ओवेसी हे मेरठमधील किठौर इथला एक निवडणूक कार्यक्रम आटोपून दिल्लीसाठी रवाना होत होते. त्यावेळी छिजारसी टोल प्लाजाजवळ 2 लोकांनी त्यांच्या गाडीवर 3-4 राऊंड फायर केले. एकूण 3 थे 4 हल्लेखोर होते. गोळीबारात ओवेसी यांच्या गाडीचं टायर पंक्चर झालं त्यामुळे ते दुसऱ्या गाडीतून निघून गेले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami