संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

आंतरराष्ट्रीय तलावारबाज खेळाडू ओंकार धजालचा शॉक लागून मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

सोलापूर – सोलापूरातील लष्कर परिसरात राहणारे तलवारबाज आंतरराष्ट्रीय खेळाडू ओंकार बलराज धजाल वय वर्षे १९ यांचा शॉक लागून मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. आई-वडिलांबरोबर फिरायला म्हणून शेतात गेलेल्या ओंकारला तिथेच शॉक लागून मृत्यू ओढावला. या घटनेनें संपूर्ण क्रीडा क्षेत्रात व लष्कर परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बलराज हे आई वडिलांसोबत सोरेगाव परिसरातील डोणगाव रोड येथील शेतामध्ये फिरायला गेले होते. शेतातील पत्राशेड वर चढून नारळाच्या झाडावरून नारळ काढण्यासाठी गेले असताना नारळ काढून खाली उतरत असताना त्या झाडा शेजारून गेलेल्या विजेच्या मेन लाइनचा शॉक ओंकार यांना बसला आणि ते जागेवरच खाली उभे असलेल्या त्यांच्या आई- वडिलांसमोर बेशुद्ध पडले. ताबडतोब त्यांना उपचारासाठी आश्विनी हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ओंकार बलराज धजाल हे वालचंद महाविद्यालयात बी.ए.च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असून आंतरराष्ट्रीय खेळाडू होते. भारतातील मलेशिया, मुंबई व विविध राज्यातील स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. तलवारबाजीमध्ये त्याने सुवर्णपदक मिळवले आहे. तसेच राजस्तरीय स्पर्धांमध्ये विजेते पदक मिळवले आहेत. इंडियन मॉडेल स्कूल येथे प्रशिक्षक म्हणूनही ते जात असल्याची माहिती मिळाली आहे. अवघ्या १९वर्षात सुवर्णंपदक मिळविलेल्या ओंकार यांच्या जाण्याने क्रीडा क्षेत्रात व लष्कर परिसरात शोककळा पसरली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami