संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर अनिश्‍चित काळासाठी बंदी

plane, flight, sunset-513641.jpg
Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्‍ली – कोरोना महामारीमुळे भारताकडून नियमित आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घातली होती. ही बंदी अनिश्‍चित काळ वाढवण्याचा निर्णय हवाई वाहतूक क्षेत्र नियामक मंडळाने (डीजीसीए) घेतला असून ही बंदी कोणत्या तारखेपर्यंत राहणार हे मात्र डीजीसीएने स्पष्ट केले आहे.

हे निर्बंध आंतरराष्ट्रीय मालवाहतूक विमानसेवा आणि विशेषत: डीजीसीएने मंजूर केलेल्या विमानांना लागू होणार नाही आणि तात्पुरत्या हवाई प्रवास योजनेला हा नियम लागू नसल्याचे डीजीसीएने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. भारतातील नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणांवरील बंदी यावर्षी 28 फेब्रुवारीपर्यंत लागू होती. कोरोनामुळे 23 मार्च 2020 पासून भारतात आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली होती, परंतु द्विपक्षीय हवाई प्रवास व्यवस्थेअंतर्गत जुलै 2020 पासून विशेष प्रवासी उड्डाणे कार्यरत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami