संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

आओ तुम्हें चांद पे ले जाएं! बायकोला चंद्रावर नेणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : आओ तुम्हें चांद पे ले जाएं या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. या गाण्यात गायकाने चंद्रावर जाण्याची कल्पना केली आहे.लवकरच ही कल्पना प्रत्यक्षात साकारणार आहे. जपानचा एक 82 वर्षीय व्यक्ती आपल्या बायकोला थेट चंद्रावर फिरायला नेणार आहे. स्पेस टूर अर्थात अंतराळ सफरीचे तिकिट बुक करणारा हा जगातील पाहिला पर्यटक आहे.

जपानचे रहिवासी असलेले डेनिस टिटो हे जगातील पहिले अंतराळ पर्यटक ठरणार आहेत. टिटो यांनी चंद्रावर जाण्यासाठी स्टारशिप रॉकेटची दोन तिकिटे बुक केली आहेत.डेनिस टिटो त्यांची पत्नी अकिकोसह चंद्राची सफर करणार आहेत. त्याची स्पेस टूर आठवडाभराची असणार आहे. या टूरची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.टिटो यांच्यासह या टूरमध्ये आणखी 10 पर्यटकही चंद्रावर जाणार आहेत. स्पेस टूर करणारे हे पर्यटक चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार नाहीत.
स्पेस टूरला जाणाऱ्या या पर्यटकांना अनेक चाचण्यांमधून जावे लागणार आहे. त्यानुसारच यांच्या टूरचे नियोजन केले जाणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami