संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 08 August 2022

आकाश अंबानींची रिलायन्स
जीओच्या चेअरमनपदी नियुक्ती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जीओच्या संचालकपदावरून पायउतार केला आहे. रिलायन्स जीओ बोर्डाची आज बैठक झाली. बैठकीत रिलायन्स जीओच्या बोर्डाने आकाश अंबानी यांची बोर्डाच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली. पंकज मोहन पवार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. पंकज मोहन पुढील 5 वर्षे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणार आहे. रामिंदर सिंग गुजराल आणि के.व्ही चौधरी यांची कंपनीच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. कंपनीच्या संचालक मंडळाच्या चेअरमनपदी आकाश एम. अंबानी यांची नियुक्ती मंजूर करण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami