संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

आकासा एअरची पाळीव प्राण्यांनासोबत घेऊन प्रवासाची परवानगी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली:- विमान प्रवासादरम्यान तुम्ही पाळीव कुत्रा किंवा मांजरासोबत विमानाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अकसा या नवीन एअरलाइने १नोव्हेंबर 2022 पासून विमानात पाळीव कुत्रा किंवा मांजर घेऊन प्रवास करण्याची परवानगी देईल. प्रवाशांना विमानाच्या केबिन आणि कार्गोमधून पाळीव प्राण्यांना घेऊन जाण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू होणार आहे. आकासा एअर ही पाळीव प्राण्यांना उड्डाणांमध्ये परवानगी देणारी दुसरी विमान कंपनी ठरली आहे.

आकासा एअरची स्थापना राकेश झुनझुनवाला आणि विनय दुबे यांनी केली.आकासा एअरलाइने म्हटले की, एखादी व्यक्ती 7 किलो वजनाच्या पिंजऱ्यात पाळीव कुत्रा किंवा मांजर घेऊन विमानात प्रवास करू शकणार. प्रत्येक पाळीव प्राणी पिंजऱ्यात असणे बंधनकारक असेल. पाळीव प्राण्यांच्या प्रवासासाठी शुल्क आकारले जाणार असून ते लवकरच जाहीर केले जाईल.अकासा एअरचे सह-संस्थापक आणि मुख्य विपणन आणि अनुभव अधिकारी बेल्सन कौटिन्हो यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात पाळीव कुत्रा किंवा मांजरीसोबत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami