मुंबई- इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल-२०२३ च्या मिनी लिलावाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.हा लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे.त्याच वेळी सर्व संघांना या कालावधीत अतिरिक्त ५ कोटी रुपये खर्च करण्याचे स्वातंत्र्य मिळेल आहे.संघांना पर्समध्ये आणखी ५ कोटी रुपये आले आहे.म्हणजे संघाच्या पर्समध्ये ९० ऐवजी ९५ कोटी रुपये असतील.
आयपीएलने आपल्या १० फ्रँचायझींना १५ नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितले आहे.आयपीएल २०२३ साठी संघांद्वारे खेळाडूंना कायम ठेवण्याची मर्यादा नाही,एक संघ त्यांना हवे तितके खेळाडू ठेवू शकतो. गेल्या हंगामाच्या लिलावानंतर पंजाब किंग्जकडे सर्वाधिक ३.४५ कोटी रुपये शिल्लक होते. पंजाब व्यतिरिक्त, चेन्नई सुपर किंग्जकडे २.९५ कोटी,आरसीबीकडे १.५५ कोटी, राजस्थान रॉयल्सकडे ९५ लाख, कोलकाता नाईट रायडर्सकडे ४५ लाख, गुजरात टायटन्सकडे १५ लाख आणि मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडे प्रत्येकी १० लाख रुपये आहेत.तर लखनऊ सुपर जायंट्सने संपूर्ण पर्स रिकामी केली आहे.हा मिनी लिलाव मेगा लिलावाप्रमाणे दोन दिवस चालणार आहे, लिलावाची सर्व प्रक्रिया एकाच दिवसात पूर्ण होणार आहे.यापूर्वीच्या मिनी लिलावात संघांनी परदेशी खेळाडूंवर मोठ्या बोली लावल्या आहेत. बेन स्टोक्स, सॅम करन आणि कॅमेरॉन ग्रीन हे अष्टपैलू खेळाडू लिलावासाठी आपली नावे ठेवतील का हे पाहण्यासाठी यंदा फ्रँचायझी उत्सुक आहेत.
दरम्यान,अजून तरी कोणत्याही संघाने रिटेन्शन लिस्ट जाहीर केलेली नाही,मात्र काही संघांच्या अहवालांनुसार बरीच मोठी नावे जाहीर केली जाऊ शकतात.त्यामध्ये मुंबई इंडियन्सचा केरॉन पोलार्ड,गुजरात टायटन्सचा मॅथ्यू वेड,दिल्ली कॅपिटल्सचा शार्दुल ठाकूर, राजस्थान रॉयल्सचा नवदीप सैनी,पंजाब किंग्जचा मयांक अग्रवाल,शाहरुख खान आणि कोलकाता नाईट रायडर्सचा शिवम मावी,
व्यंकटेश अय्यर या खेळाडूंचा समावेश आहे.