संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

आगामी पालिका निवडणुकीत मनसे किंगमेकर नाही किंग बनणार आहे!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची आज शिवतीर्थावर बैठका पार पडली. ठाणे, मुंबई, नाशिक येथे होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकांच्या पाश्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, आगामी निवडणुकीत आम्ही किंगमेकर नाही किंग बनणार आहोत.

ठाणे , पुणे, नाशिक येथे मनसे नेते दौरे करणार असून नेते आपल वैयक्तिक अहवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सदर करेल. नेत्यांच्या दौऱ्याचा आढावा आला की मनसे अध्यक्ष राज ठाकरे दौरा करतील. कोअर कमिटीची मिटिंग होऊन त्यात निवडणुकीच्या संदर्भात रणनीती आणि निर्णय घेतला जाईल. साहेब जातीनं लक्ष घालणार आहेत. आजच्या बैठकीत मुंबईवर चर्चा झाली नाही तर ठाणे, नाशिक, पुणे पालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली, असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami