संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा समावेश करून कुस्तीला वगळले !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – राष्ट्रकुल स्पर्धेच्या संघटनेने २०२६ मध्ये ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे होणार्‍या क्रीडा महोत्सवातील खेळांची यादी जाहीर केली आहे.यामध्ये नेमबाजी या खेळाचा समावेश करण्यात आला आहे.बर्मिंगहॅम येथे या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या खेळाला वगळण्यात आले होते.मात्र व्हिक्टोरियामधील स्पर्धेत या खेळाचे पुनरागमन करण्यात आले आहे.पण कुस्ती या खेळाला पुढील प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवातून वगळण्यात आले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या संघटनेकडून करण्यात आलेली घोषणा भारतासाठी ‘कही खुशी कही गम’ यासारखीच ठरली आहे. भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये नेमबाजी या खेळात आतापर्यंत सर्वाधिक १३५ पदके पटकाविली आहेत.तसेच कुस्तीमध्ये ११४ पदके जिंकण्यात भारतीयांना यश लाभले आहे.तिरंदाजीत भारतीयांना आठ पदके पटकावता आलेली आहेत.पुढील स्पर्धेमध्ये कुस्ती व तिरंदाजी हे दोन्ही खेळ नसणार आहेत. त्यामुळे हे भारतासाठी निश्‍चितपणे निराशाजनक असणार आहे.
व्हिक्टोरिया (२०२६) स्पर्धेतील खेळ- ॲथलेटिक्स व पॅरा ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, पॅरा बास्केटबॉल (३ बाय ३ व ३ बाय ३ व्हीलचेअर),बॉक्सिंग,बीच व्हॉलीबॉल,कोस्टर रोईंग, टी-२० क्रिकेट (महिलांसाठी फक्त),सायकलिंग (बीएमएक्स, माऊंटन बाईक, रोड, ट्रॅक आणि पॅरा ट्रॅक), डायव्हींग, गोल्फ, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, लॉन बॉल्स व पॅरा लॉन बॉल्स, नेटबॉल, पॅरा वेटलिफ्टिंग, रग्बी सेव्हन्स,नेमबाजी व पॅरा नेमबाजी, स्क्वॉश, टेबल टेनिस व पॅरा टेबल टेनिस, ट्रायथलॉन व पॅरा ट्रायथलॉन,वेटलिफ्टिंग
गोल्फ, रोईंगचा पहिल्यांदाच सहभागव्हिक्टोरिया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये तीन नव्या खेळांचा पहिल्यांदाच समावेश होणार आहे.यामध्ये गोल्फ,बीएमएक्स रेसिंग व रोईंग या खेळांचा समावेश असणार आहे.या स्पर्धेमध्ये २२ खेळाडूंच्या २६ क्रीडा शर्यतींमध्ये खेळाडू सर्वस्वपणाला लावणार आहेत.यामध्ये ९ पॅरा खेळांचा समावेश असेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami