- तब्बल १५ मिलियन डॉलर किंमतीचा एकमेव हिरा
नवी दिल्ली- जगातील सर्वात मोठ्या निळ्या हिऱ्याचा यावर्षीच्या एप्रिल महिन्यात लिलाव झाला होता.मात्र आता असा एक अति मौल्यवान निळ्या रंगाचा हिरा समोर आला आहे की हा हिरा आजवरचा सर्वांत दुर्मिळ आणि किंमती हिरा ठरणार आहे.या हिऱ्याचा क्रिश्तीच्या दागिन्यांच्या लिलावात विक्री केली जाणार आहे.या हिर्याची विक्री १५ मिलियन डॉलर पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हा जगातील सर्वांत दुर्मिळ हिरा असून तो ३१.६२ कॅरेटचा आहे.हा हिरा अन्य भव्य दागिन्यांच्या विक्रीचा भाग असणार असून यामध्ये कार्टीयरने बसविलेला डायमंड पाम ट्री ब्रोच आहे. त्याची किंमत ५ लाख डॉलर्स इतकी होण्याची अपेक्षा आहे.या वर्षीच्या एप्रिल महिन्यात अशाच एका दुर्मिळ आणि निळ्या रंगाच्याच हिऱ्याचा लिलाव झाला होता.त्याची किंमत ५७.५दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे ४.४ अब्ज रुपये होती.फाईन आर्टस् ललित कला कंपनी सोथेबीजने हाँगकाँगमध्ये या हिऱ्याचा लिलाव केला.१५ .१० -कॅरेट स्टेप कट असलेल्या या रत्नाला ‘द डी बियर्स कलिनन ब्लू’ असे नाव देण्यात आले आहे.रंगीत हिर्यांमध्ये सर्वोच्च स्थान असलेला हा दक्षिण आफ्रिकेतील कुलीनन खाणीत हा सापडला होता.