संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

आजाराशी झुंज देताना सिन्नरच्या जवानाचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक: सिन्नर तालुक्यातील कणकोरी येथील भूमिपुत्र, भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान गणेश संपत जगताप यांचे बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ते काश्मीर येथे कार्यरत होते. जगतात यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डेंग्यू संसर्ग झाल्याने ते आजारी होते. यावर दिल्ली येथील लष्करी रुगणालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे समजते. शुक्रवारी दुपारी दोन वाजता त्यांच्यावर सिन्नर तालुक्यातील कंकोरो येथे मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दिल्ली येथील लष्करी मुख्यालयातील सोपस्कार पार पडल्यांनंतर विशेष त्यांचे पार्थिव सकाळी साडेदहा वाजता शिर्डी विमानतळावर आणण्यात आले. तेथून त्यांच्या मूळ गावी पार्थिव नेण्यात आले. ग्रामस्थांकडून जवानास अखेरची मानवंदना देण्यात आली. गावातील अमरधामकडे जाणारे रस्ते यावेळी तातडीने दुरुस्त करण्यात आले. संपूर्ण गावात स्वच्छता करण्यात आली आहे. अमरधाम चा परिसर फुलांच्या माळांनी सजवण्यात आला होता. रात्रीपासूनच परिसरात पावसाची संततधार सुरु होती. मात्र अंतिमसंस्कार ठरल्याप्रमाणे पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील ग्रामस्थांच्या बरोबरीने पुढाकार घेतळ्याचे पहायला मिळाले. जवान गणेश जगताप यांच्या पश्चात आई-वडील,भाऊ,बहीण, पती,मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami