मुंबई – मुंबईकरांनो आज, रविवारी घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. कारण आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या विविध कामांमुळे उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
आज मध्य रेल्वेवर कल्याण ते कुर्लादरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी अनेक एक्सप्रेस दुसर्या मार्गावर वळवण्यात येणार असून १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
11010 पुणे – मुंबई सिंहगड एक्सप्रेस, 17611 हजूर साहिब नांदेड- मुंबई राज्य राणी एक्सप्रेस, 12124 पुणे – मुंबई डेक्कन क्वीन, 13201 पाटणा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 17221 काकीनाडा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 22160 चेन्नई-मुंबई एक्सप्रेस, 12168 बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस, 12321 हावडा- मुंबई मेल (प्रयागराज मार्गे), 12812 हटिया – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि 11014 कोईम्बतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि निर्धारित वेळेच्या १०-१५ मिनिटे उशिराउशिराने पोहोचेल. तसेच 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस आणि 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कल्याण येथे 10-15 मिनिटे उशिराने पोहोचेल. 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस ठाणे आणि दिवा दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवली जाईल आणि वेळापत्रकापेक्षा दहा-पंधरा मिनिटे उशिरा चालेल.
तसेच हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी या अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल / बेलापूर / वाशी या डाऊन मार्गावर सकाळी १०.३४ ते ३.३६ पर्यंत रेल्वे सेवा बंद असणार आहे. तर पनवेल / बेलापूर / वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या अप मार्गावर सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ पर्यंत रेल्वे सेवा बंद असणार आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या विभागात विशेष लोकल चालविण्यात येतील. तर, ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी / नेरूळ मार्गे सकाळी 10 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करता येणार आहे.