संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

आज मध्य, हार्बर व पश्चिमरेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : रेल्वे मार्गावरील रुळांची आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवली अप आणि डाऊन धीम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गिकेवर सेवा उपलब्ध असेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव धीमा मार्ग रात्री १२. ३० ते पहाटे ४.३८ वाजेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान अप-डाउन धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान सर्व लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत काही उपनगरीय लोकल रद्द असणार आहे तर रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसेल.

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड या जलद मार्ग सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंडदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. ठाण्याच्या पुढे जलद असलेल्या गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. ठाणे येथून अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.

हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी येथे सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.- ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर येथून सीएसएमटी/गोरेगावकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल-ठाणे या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami