संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

आज मुंबई महापालिकेचा ऑनलाईन अर्थसंकल्प

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – निवडणुकीच्या तोंडावर आज आशियातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आजही मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ऑनलाईन पद्धतीने सादर होणार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला काय गिफ्ट मिळणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. आज मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

पालिकेचा 2020-2021चा बजेट मांडताना 33441.02 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षी 2021-22च्या अर्थसंकल्पात नव्या प्रकल्पांसह मोठ्या विकास योजनांसाठी तब्बल 16.74 टक्क्यांची वाढ करून 39 हजार 38 कोटींचे मेगा बजेट सादर करण्यात आले होते. तर, यंदाच्या अर्थसंकल्पात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प काय असणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या बजेटमध्ये मुंबईकरांसाठी काय असणार? करवाढ, शुल्कवाढ होणार का? मुंबईत कोणत्या प्रकल्पांवर सत्ताधाऱ्यांचा कल असेल? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami