मुंबई – मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर आज, रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक आहे. ट्रान्स हार्बर आणि उरण मार्गावर उद्या मेगाब्लॉक नाही. हार्बरवरील मेगाब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव, बांद्रा, चुनाभट्टी दरम्यानची रेल्वेसेवा बंद ठेवण्यात येणार आहे. तर कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वरून पनवेलसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि गोरेगाव, वाद्रे दरम्यान सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेल, वडाळा, वांद्रे आणि गोरेगाव दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वरून बेलापूर आणि पनवेलसाठी विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर माहिम ते वांद्रे आणि वांद्रे ते अंधेरी या मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बरच्या प्रवाशांना त्याच तिकीट आणि पासावर पश्चिम आणि मध्य रेल्वेतून प्रवासाची मुभा दिली आहे. दरम्यान, ट्रान्स हार्बर आणि उरण मार्गावर आज मेगाब्लॉक नाही. त्यामुळे येथील रेल्वे सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू राहील, असे रेल्वेने म्हटले आहे.