मुंबई – हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. अनेक महिला या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. वटपौर्णिमा म्हटले की, घरात गोडाचे जेवण, देवाला नैवेद्य, नवीन साडी, श्रृंगार अशा अनेक गोष्टींची लगबग असते. आज, मंगळवार 14 जून 2022 रोजी वटपौर्णिमेचे व्रत करण्यात येत आहे.
या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात. वटवृक्षात त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश राहतात, अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच वटवृक्षाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असेही मानले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात वटवृक्षाला खूप महत्त्व दिले जाते. उत्तर भारतात याला वटसावित्री व्रत आणि दक्षिण भारतात वटपौर्णिमा व्रत असे म्हणतात.
आजचा वट पौर्णिमा व्रत, पूजा, तिथी आणि शुभ मुहूर्त :
वट पौर्णिमा व्रत तारीख : १४ जून, सोमवार
वट पौर्णिमा व्रत तिथी सुरुवात : 13 जून, सोमवारी रात्री 09:02 वाजता
पौर्णिमा तिथी समाप्त : मंगळवार, 14 जून संध्याकाळी 05.21 वाजता
वट पौर्णिमा व्रत पूजेची शुभ वेळ : सकाळी 11:00 ते दुपारी 12:15