मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजता आणि ठाणे-वाशी दरम्यान रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. माहीम ते गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गावर पश्चिम रेल्वेकडून जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे काही लोकल फेर्या रद्द होणार असून काही लोकल फेर्या विलंबाने धावणार आहेत. दरम्यान, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक असणार नाही. दरम्यान, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशी दरम्यान लोकल फेर्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव लोकल फेर्या रद्द राहणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी कुर्ला फलाट क्रमांक आठवरून पनवेल करिता विशेष लोकल फेर्या चालवण्यात येणार आहेत.
तसेच ब्लॉक कालावधीत मध्य रेल्वेकडे जाणार्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वांद्रे आणि गोरेगाव-पनवेल लोकल रद्द राहणार आहेत. त्याचबरोबर चर्चगेट ते गोरेगाव दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल फेर्या देखील रद्द राहणार आहेत.