संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

आझम खान यांच्या विद्यापीठावर छापा! मदरसातून चोरलेली हजारो पुस्कते जप्त

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनऊ:- समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सपा आमदार आझम खान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी अधिक वाढल्या आहे. त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम खान यांच्या दोन जवळच्या मित्रांना पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी जुगार खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या. त्यात जौहर विद्यापीठाच्या परिसरात खोदकाम करताना मदरसा आलिया येथून चोरलेली पुस्तके तसेच पालिकेचे क्लिनिंग मशीन पोलिसांनी जप्त केले.

या प्रकरणी आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांच्यासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅम्पसमध्ये बांधलेल्या एका खोलीत सदर पुस्तके लपवून ठेवलेली होती खोदकामानंतर ही पुस्तके सापडली आहेत. मदरसा आलिया लायब्ररीतून सदर चोरीला गेली होती. यानंतर 2019 पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली होती. मदरसा आलिया लायब्ररीची स्थापना 1774 मध्ये नवाब रामपूर यांनी केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami