संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 07 December 2022

आठवड्याच्या सुरुवातीलाच सकाळच्या वेळी वेस्टर्न रेल्वेचा खोळंबा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – आज सोमवारी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा भल्या पहाटे विस्कळीत झाली होती. त्यामुळे सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. पहाटे साडेपाच वाजता दहिसर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने बोरिवली स्थानकातील चार फलाट बंद करण्यात आले होते. परिणामी प्रवासी लोकलमध्ये सुमारे तासभर ताटकळत होते. बराच वेळ लोकल सुरू होत नसल्याने त्यांनी स्टेशन मास्तरांची केबिन गाठली. तेव्हा त्यांना ओव्हरहेड वायर तुटल्याचे सांगण्यात आले. मात्र तोपर्यंत रेल्वेकडून कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच सर्व वाहतूक धीम्या रुळावरून वळविण्यात आल्याने प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला होता. तर काही लोकल रद्द करण्यात आल्या आणि काही लोकल स्थानकांमध्येच थांबविण्यात आल्या. त्यामुळे दहिसर ते बोरिवलीदरम्यान प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तसेच विरार, वसई, नालासोपारा या स्थानकांतही प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

चर्चगेट आणि लगतच्या परिसरात अनेक कार्यालये आहेत. येथे नोकरीसाठी मुंबई आणि उपनगरांतून दररोज हजारो लोक लोकलने ये-जा करत असतात. अशातच सकाळच्या वेळी ही घटना घडल्यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला. बराच वेळ लोकल थांबून राहिल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उतरून पायी चालण्यास सुरुवात केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami