नवी दिल्ली-आता पीएचडी करण्याची इच्छा असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच युजीसी पीएचडीच्या नियमांत मोठा बदल केला आहे.नव्या नियमानुसार,आता लग्न किंवा इतर कोणत्याही कारणात्सव दुसऱ्या शहरात स्थायिक झालात तरी तुम्हाला तिथूनही अर्धवेळ स्वरूपात पीएचडी करता येणार आहे. तसेच त्यासाठी संशोधन प्रसिद्ध करण्याची अटही रद्द करण्यात आली असल्याची माहिती यूजीसीने दिली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने आता नवा नियम जारी केला आहे. २०१६ मध्ये पीएचडीसाठी नवे नियम जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार,आता पुन्हा नियमांत बदल केले आहेत. याआधी पदव्युत्तर पदवी, एम फील आणि नेटसेट पूर्ण केल्यावरच पीएचडी करण्यास परवानगी होती. मात्र आता पदव्युत्तर पदवीचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पीएचडीला प्रवेश मिळणार आहे. तसेच चार वर्षांचा आणि आठ सत्रांचा अभ्यासक्रम किमान ७५ टक्के गुणांनी पूर्ण केला तरी पीएचडी करता येईल. त्याचप्रमाणे यापुढे कोणत्याही कारणास्तव महिला किंवा तरुणींना शहर सोडावे लागले तर स्थलांतरित शहरातही त्या आपला पीएचडी अभ्यासक्रम सुरू ठेवू शकतील शकणार आहेत.
यासाठी काही नियम आणि अटी आहेत. या नियम आणि अटींची पूर्तता झाल्यास विद्यार्थीनींनी आतापर्यंत केलेला अभ्यास ट्रान्स्फर होऊ शकतो. विद्यार्थींनीना त्यांच्या शोधनिबंधात सर्व मार्गदर्शकांचे श्रेय द्यावे लागणार आहे. आतापर्यंत महिला शोधकर्त्यांना दोन वर्षांचा अतिरिक्त काळ दिला जायचा.याच काळात प्रसुतीपूर्व आणि बालसंगोपनासाठी २४० दिवसांची सुट्ट्यांची मुभा देण्यात आली आहे. सात नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या नव्या मार्गदर्शकतत्त्वानुसार, कोणताही कर्मचारी किंवा शिक्षक अर्धवेळ पीएचडी करू शकतो.पूर्वी कोणत्याही सरकारी कर्मचारी किंवा शिक्षकाला पीएचडी करण्यासाठी आपल्या विभागातून अध्ययन सुट्टी घ्यावी लागत होती. विशेष म्हणजे अर्धवेळ पीएचडी करणाऱ्यास पूर्णवेळ पीएचडी चेच पात्रता निकष लागु असणार आहेत.