संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

आता उसतोड कामगार महामंडळाची वर्गणी भरली तरच गाळप परवाना

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर – आता यापुढे गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळाची थकीत वर्गणी भरल्याशिवाय ऊस गाळपाचे परवाने मिळणार नाहीत ,अशा आशयाचे पत्र साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांना पाठवल्याने कारखानदार नाराज झाले आहे.दरम्यान, साखर आयुक्तांनी वर्गणीसाठी सक्ती न करता उलट त्यात सवलत देण्याची मागणी साखर कारखानदारांनी साखर आयुक्तांकडे केली आहे.
वास्तविक महामंडळाची वर्गणी भरण्यासाठी हप्ते पाडून द्यावेत अशी विनंती १६ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत साखर कारखानदारांनी केली होती.त्यावेळी गाळप झालेल्या उसावर प्रतिटन ३ रुपये भरून उर्वरित रक्कम डिसेंबर २०२२ पर्यंत भरण्याचे साखर आयुक्तांनी सुचवले होते.मात्र कमी कालावधीमुळे आणि केंद्राने एफआरपीची रक्कम वाढविल्याने साखर कारखाने अडचणीत आले आहेत.यात साखर खरेदी दरही वाढलेला नाही.त्यामुळे ही वर्गणी भरणे अनेक कारखानदारांना शक्य झालेले नाही.तरी प्रतिटन ३ रुपयेप्रमाणे आम्ही वर्गणी रक्कम भरू पण उर्वरित रकमेच्या मुदतीची अट शिथिल करावी अशी मागणी आता कारखानदारांनी साखर आयुक्तांना एका पत्राद्वारे केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami