नवी दिल्ली – ओयो कंपनी तंत्रज्ञान आणि उत्पादन टीममधील 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत आशी माहिती समोर आली आहे. अनेक प्रकल्प बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. कर्मचाऱ्याना काढताना कंपनीने आज निवेदनात सांगितले की, विक्री विभागात 250 अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ओयो उत्पादन, अभियांत्रिकी, कॉर्पोरेट मुख्यालय आणि ओयो व्हेकेशन होम टीमचा आकार कमी करत आहे. दुसरीकडे कंपनी रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये लोकांना जोडणार आहे.