सॅन फ्रान्सिस्को -एलॉन मस्क यांनी ट्विटर आपल्या ताब्यात घेतल्यापासून अमुलाग्र बदल करण्याचा सपाटा लावला आहे.त्यात कर्मचारी कपातीचा मोठा भाग आहे.कर्मचाऱ्यांना कामावरून काढताना त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांनाही सोडलेले नाही.मस्क यांनी ट्विटर कंपनीतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. आता त्यांच्या जागी साफ सफाईचे काम रोबोट करणार आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढताना कोणतेही पूर्व वेतन देण्याचे सौजन्य दाखविण्यात आलेले नाही.एलन मस्क यांची ही कारवाई कायद्याला धरून आहे का?याची तपासणी केली जात आहे.या कर्मचाऱ्यांच्या जागेवर रोबोटची नेमणूक केली जाणार असून रोबोट च आता साफसफाईचे काम करणार आहे, अशी माहिती सॅन फ्रान्सिस्कोचे प्रसिद्ध वकील डेव्हिड चिउ यांनी म्हटले आहे.ट्विटर कंपनीत गेली १० वर्षे साफसफाईचे काम करणारे ज्युलिओ अल्वाराडो यांनी सांगितले की,मस्क यांनी सफाई दरम्यान वैयक्तिक सुरक्षा घेतली असून त्यांच्या टीममधील एकाची नोकरी जाणार आहे.विशेष म्हणजे या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार असल्याची मागील आठवड्यातच कुणकुण लागली होती.त्यामुळे त्यांनी आंदोलनही केले होते. तरीही मस्क यांनी त्यांच्या आंदोलनाला न जुमानता त्यांना कामावरून काढले आहे,अशी कामगार संघटनेचे अध्यक्ष मिरांडा यांनी सांगितले.दरम्यान,सॅन फ्रान्सिस्कोचे प्रसिद्ध वकील डेव्हिड चिउ यांनी सांगितले की,खरे तर मस्क यांचा कायदे मोडण्याचा आजवरचा इतिहास आहे.
यात मला या कामगारांची चिंता वाटत असून मी या प्रकरणाचा अभ्यास करत आहे.