संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

आता त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात फुले, प्रसाद, नारळ नेण्यास बंदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक- जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहात काही दिवसांपासून कोरोनामुळे पुजारीवगळता अन्य भाविकांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. त्याबाबत साधू-महंत आक्रमक झाले असतानाच आता मंदिरात फुले, नारळ, प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोना काळात जवळपास दीड वर्ष मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद होते.

कोरोनाचा प्रभाव कमी होताच दरवाजे उघडल्यानंतर मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्र्यंबकेश्वर येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. मात्र त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी जातांना सोबत फुले, नारळ, प्रसाद घेऊन जाण्यास ट्रस्टने मनाई केली आहे. फुले, नारळ, प्रसादाला बंदी करण्यामागे कोरोनाचे सुरक्षा नियम असल्याचे कारण देवस्थान ट्रस्ट सांगत आहे. मात्र इतर सर्व सुरक्षेचे नियम तोडले जात असतांना केवळ फुलांना बंदी केली जात असल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. देवस्थान ट्रस्ट मंदिर प्रांगणाच्या प्रवेशद्वारातून आत जाताच भाविकांच्या हातात असलेली फुलांची परडी काढून घेतली जात आहे. दरम्यान प्रवेशद्वारात असलेली धातू शोधक सुरक्षा चौकट मात्र बंद आहे, ती यंत्रणा दुरुस्त करुन भाविकांना सुरळीत प्रवेश दिला जावा अशी मागणी केली जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami