संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 30 January 2023

आता प्रयोगशाळेत रक्ताची निर्मिती माणसावर क्लिनिकल चाचण्या सुरू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लंडन- एखाद्या गंभीर आजारी रुग्णाला किंवा अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला बाहेरून रक्त देण्याची गरज भासते. अशावेळी त्याच्या ब्लड ग्रुपला मॅच होणारा दाता शोधावा लागतो किंवा मग ब्लड बँकेतून रक्त आणावे लागते.रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी जगभरातील सरकार आणि सेवा भावी संस्थांकडून ‘रक्तदान’ करण्याचे आव्हानही केले जाते. मात्र, तरीदेखील जागतिक पातळीवर रक्ताचा तुटवडा भासत आहे.आता ब्रिटनमधील संशोधकांनी यावर उपाय म्हणून प्रयोगशाळेत रक्ताची निर्मिती केली आहे.संशोधकांनी या रक्ताची मानवी क्लिनिकल चाचणीही सुरू केली आहे.
अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे जवळपास दोन चमचे प्रयोगशाळेत तयार केलेले रक्त काही व्यक्तींच्या शरीरात भरण्यात आले आहे.मानवी शरीरात हे कृत्रिम रक्त कशाप्रकारे कार्य करते,याची चाचणी केली जात आहे.प्रयोगशाळेत रक्त तयार करण्याच्या प्रोजेक्टमध्ये ब्रिस्टल,केंब्रिज, लंडन आणि एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लँट या चार ठिकाणच्या संशोधकांच्या गटांनी एकत्र काम केले. या प्रोजेक्टमध्ये, फुफ्फुसातून शरीराच्या उर्वरित भागांत ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या लाल रक्तपेशींवर संशोधन करण्यात आले.ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी नियमितपणे रक्तदान करणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणात मदत होते.परंतु,
अति-दुर्मिळ रक्तगट असलेल्या रुग्णांना रक्ताचा तुटवडा प्रकर्षाने जाणवतो. असे अति-दुर्मिळ रक्तगट असलेलं रक्त तयार करणं, हे प्रयोगशाळेत रक्त तयार करण्याच्या प्रोजेक्टचे मुख्य उद्दिष्ट आहे.सिकलसेल आणि अॅनिमियासारख्या आजारांमुळे काही रुग्णांना नियमित ब्लड ट्रान्सफ्युजनची आवश्यकता असते.जर,रुग्णाला बाहेरून भरलेले रक्त हे शरीरातील अगोदरच्या रक्ताशी तंतोतंत जुळलं नाही तर शरीर त्याला प्रतिसाद देत नाही.परिणामी, उपचार अयशस्वी होतात. टिश्यु-मॅचिंगची ही प्रक्रिया ए,बी,एबी आणि ओ रक्तगटांच्या पडताळणी पलीकडील असते.
दरम्यान,ब्रिस्टल विद्यापीठातील प्रोफेसर आणि प्रयोगशाळेत रक्त तयार करण्याच्या प्रॉजेक्टचा भाग असलेले अ‍ॅशले टॉय म्हणाले की, ‘काही रक्तगट खरोखर खूप-खूप दुर्मिळ आहेत. इतके दुर्मिळ की देशातील फक्त १० लोक अशा प्रकारचे रक्त दान करू शकतात.याक्षणी यूकेमध्ये ‘बॉम्बे’ रक्तगटाची फक्त तीन युनिट्स आहेत.’ ‘बॉम्बे’ रक्तगटाची ओळख सर्वप्रथम भारतात झाली होती. या गटाच्या रक्तातील फेनोटाइपमध्ये लाल पेशींच्या पडद्यावर ‘एच’ अँटिजेन नसते आणि सीरममध्ये अँटि-एच असतो. प्रयोगशाळेत रक्तपेशीपासून रक्त बनवण्याची प्रक्रिया तशी आव्हानात्मक आहे. स्टेम सेल पासून रक्त बनवणे ही पहिलीच घटना आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami