संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

आता १२ वर्षांवरील मुलांनाही मिळणार लस, Corbevax ला आपत्कालीन वापरासाठी परवानगी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला वेग आला आहे. अनेकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, १२ वर्षांवरील लहान मुलांचे लसीकरण अद्यापही सुरू झालेले नाही. मात्र, १२ वर्षांवरील मुलांसाठीच्या Corbevax या लसीला आपत्कालीन मान्यता देण्यात आली आहे. हैदराबादच्या ‘बायोलॉजिकल ई’ (Biological E) कंपनी निर्मित असलेली ‘कॉर्बेवॅक्स’ (Corbevax) या लसीला औषध नियामक प्रशासनाने (DCGI) सोमवारी आपत्कालीन मन्यता दिली आहे. त्यामुळे आता भारतातील लसीकरणाला आणखी वेग मिळणार आहे. याआधी भारतात 15 वर्षांवरील मुलांना लस दिली जात होती. आता 12 वर्षांवरील मुलांना लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Corbevax ही भारतात विकसित झालेली तिसरी लस आहे. तर नॅनोपार्टिकल कोवोवॅक्स  (COVOVAX) लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जगाला कवेत घेतलं होतं. संपूर्ण जग ठप्प झालं होतं. आता हळूहळू संपूर्ण पूर्वपदावर येत आहे. लसीकरणाने वेग घेतल्याने कोरोनाचा विळखा सैल होत आहे. त्यामुळे लसीकरणाचे महत्त्व अनेकांना पटले आहे. दरम्यान, देशात सर्व वयोगटातील नागरिकांना अद्यापही लस मिळालेली नाही. भारतात अद्यापही १५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. त्यामुळे १५ वर्षांखालील मुलांना अद्यापही कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे आता 12 वर्षांवरील मुलांसाठीच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी 12 वर्षांवरील शालेय विद्यार्थ्यांचं लसीकरणाचा मार्ग मोकळा होईल. निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत लवकरच लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाऊ शकते, असे सांगितले होते. लसीकरणासाठी आणखी लोकांना सामाविष्ट करयला हवे, असेही त्यांनी सांगितले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami