संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

आता Google Pay तुम्हाला मोठ्या व्यवहारासाठी थांबवणार नाही

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आता लोक आपली सगळी कामं मोबाईलवरून काही मिनिटांत करतात. कारण यामुळे वेळही वाचतो आणि हे तुम्ही कुठेही बसल्या बसल्या करू शकता. त्यापैकी ऑनलाईन पेमेंटसाठी जास्त वापरलं जाणारं ऍप म्हणजे Google Pay. या ऍपवरून दिवसाला लाखो लोक व्यवहार करतात. परंतु Google Pay वर दैनंदिन व्यवहार करण्यासाठी काही मर्यादा आहेत. तुम्ही ठराविक रक्कम 1 दिवसात ट्रान्सफर करू शकता. परंतु असे काही लोक आहेत ज्यांना दिवसातून अनेकवेळा व्यवहार करणे आवश्यक असते, त्यामुळे Google Pay वर दिलेली ही मर्यादा त्यांना कमी पडते. त्यामुळे अशा लोकांनी आता काळजी करण्याची गरज नाही.

तुम्ही व्यवहार करण्यासाठी एकापेक्षा अनेक पेमेंट ऍप वापरू शकता. तसेच Google Pay द्वारे तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त 1 लाखांपर्यंत रक्कम पाठवू शकता. याशिवाय तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त 10 व्यवहार करू शकता. तसेच एका दिवसात 2000 रुपयांपेक्षा जास्त पैशांची रिक्वेस्ट करता येणार नाही. परंतु अनेक वेळा ग्राहकांसोबत असे घडते की, बँकेची मर्यादा असूनही ते Google Pay वरून पैसे ट्रान्सफर करू शकत नाहीत, जर तुमच्यासोबतही असे घडले असेल तर तुम्ही ऑनलाईन वेबसाइटवर जाऊन तुमची बँक मर्यादा तपासू शकता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami