संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

आता Umang App वरून पैसे काढा, पीएफ खात्यावर कर्ज घ्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कोरोना काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या पीएफ खात्यावर कर्ज घेऊ शकता किंवा कोविड-19च्या उपचारासाठी घरी बसून पैसे काढू शकता.

EPFO ​​सदस्य त्यांच्या स्मार्टफोनद्वारे UMANG ऍप वापरून पैसे काढू शकतात. मुख्य म्हणजे ते पुन्हा जमा करण्याचीही गरज नाही. UMANG च्या मदतीने तुम्ही ऍडव्हान्सच्या स्वरूपात पैसे काढू शकता. या सुविधेमुळे ईपीएफओ सदस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र EPFO ने आपल्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यानुसार कोणताही ग्राहक वैद्यकीय उपचार, नवीन घर खरेदी, बांधकाम, नूतनीकरण, गृहकर्जाची परतफेड आणि लग्नाचा खर्च यासाठी पैसे काढू शकतो. घरासाठी जमीन किंवा घर खरेदी करण्यासाठी तुम्ही पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढू शकता. याशिवाय पती, पत्नी, पालक किंवा मुलांसाठी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत ग्राहक पैसे काढू शकतात. पैसे काढण्यासाठी लॉक-इन कालावधी किंवा किमान सेवा कालावधी यासारख्या अटी लागू आहेत.

पैसे कसे काढाल?

तुमच्या स्मार्टफोनवर Umang डाउनलोड करून लॉग इन करा.

स्क्रीनवरील ‘All Services’ या पर्यायाखाली EPFO ​​विभागावर क्लिक करा.

ड्रॉप-डाउन वर जा आणि ‘Claim’ पर्याय निवडा. त्यानंतर तुमचा EPFO ​​UAN टाइप करा.

यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा.

तुम्हाला तुमच्या फोनवर एक रेफरन्स नंबर क्लेम मिळेल.

तुमच्या पैसे काढण्याच्या रिक्वेस्ट स्टेटस ट्रॅक करण्यासाठी तुम्ही हा नंबर वापरू शकता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami