संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

आदर्श योजनेत २०२२-२३ मध्ये १,२१५ रेल्वे स्थानकांचा विकास

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*रेल्वे मंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली – देशातील १,२५३ रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. त्यापैकी १,२१५ रेल्वे स्थानके आत्तापर्यंत विकसित केली आहेत. उर्वरित रेल्वे स्थानके आदर्श स्टेशन योजने अंतर्गत २०२२-२३ पर्यंत विकसित केली जातील, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी राज्यसभेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
देशातील रेल्वे स्थानकांच्या विकासाबाबत भाजपाचे खासदार नरहरी अमीन यांनी प्रश्न विचारला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात रेल्वेमंत्री वैष्णव यांनी भारतीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानकांच्या विकास व सुशोभीकरणासाठी आदर्श स्टेशन योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करून प्रवाशांना अत्याधुनिक सेवा-सुविधा दिल्या जात आहेत, असे सांगितले. आतापर्यंत देशातील १,२१५ रेल्वे स्थानकांचा विकास केला. उरलेल्या ३८ रेल्वे स्थानकांचा २०२२-२३ या वर्षात आदर्श स्टेशन योजनेअंतर्गत विकास केला जाईल. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वे स्थानकांचा विकास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami