संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

आदित्य ठाकरेंचा ‘रायगड’ तर उदय सामंतांचा ‘रत्नसिंधू’; मंत्र्याच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावं;

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – राज्यातल्या दुकानांवर मराठी भाषेत नामफलक लावण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेतल्यांनंतर आता मंत्रांच्या बंगल्यांची नावे देखील बदलण्यात आली आहेत. मंत्र्यांच्या बंगल्यांना राज्यातल्या गड-किल्यांची नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे आता मंत्र्यांचे बंगले गड-किल्यांच्या नावाने ओळखले जाणार आहेत.

मंत्री उदय सामंत यांचा बांगला ‘रत्नसिंधू’ नावाने ओळखला जाईल तर मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बांगल्याला ‘रायगड’ हे नाव देण्यात आले आहे. राज्यातील शिवप्रेमींनी यासाठी सतत पाठपुरावा केला होता आणि या संदर्भात तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रस्ताव देखील दिला होता. उदय सामंत यांनी या प्रस्तावावर सकारात्मक पाठपुरावा केला आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतरच अखेर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचे नामांतरण करण्यात आले आहे.

यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांशी आपले मत व्यक्त करताना याबाबत समाधान व्यक्त केले असून, आपल्या वास्तूला मिळालेले ‘रत्नसिंधू’ हे नाव अचूक असल्याचे म्हटले आहे. कारण मी रत्नगिरीतून आमदार म्हणून निवडून आलो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झालो त्यामुळे आपल्या बंगल्याला मिळालेले ‘रत्नसिंधू’ हे नाव एक सुंदर योगायोग असल्याचे ते म्हणाले.

एकूणच शासकीय निवासस्थानांना देण्यात आलेल्या गड किल्ल्यांच्या नावासाठी आपल्याकडे शिवप्रेमींकडून अनेकदा प्रस्ताव आल्याचे देखील ते म्हणाले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन येथील २० बंगल्यांना गडकिल्यांची नावे देण्यात आली आहेत. ज्याप्रमाणे मलबार हील येथील बंगले देवगिरी आणि शिवालय नावाने ओळखली जातात त्याचप्रमाणे आता ही शासकीय निवासस्थनेही गड-किल्यांच्या नावाने ओळखली जातील. जेणेकरून भेटायला येणारी व्यक्ती, किंवा जनता यांच्यासमोर या गडकिल्यांच्या नावांमुळे शिवाजी महाराज्यांचा इतिहास प्रत्येकासमोर उभा राहिल आणि हीच भूमिका शिवप्रमींची होती. हीच भूमिका मी मुख्यमंत्रयंसमोर मांडली आणि त्यास मंजुरी मिळाली असेही ते म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami